दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग ४१
गौरवीच्या आईवडिलांनी लग्नाला नकार दिल्यानंतर
माधव पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी मुंबईबाहेर निघून गेला…
माधव पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी मुंबईबाहेर निघून गेला…
गौरवी मात्र हळूहळू शांत होत गेली…
घरात… कॉलेजमध्ये…
हसणं कमी झालं… बोलणं कमी झालं…
घरात… कॉलेजमध्ये…
हसणं कमी झालं… बोलणं कमी झालं…
महिने सरकले…
पण दोघांचं नातं तुटलं नाही…
पण दोघांचं नातं तुटलं नाही…
फोनवरून ते अजूनही एकमेकांचा आवाज धरून ठेवत होते…
नोव्हेंबरचा थंड महिना सुरू झाला…
त्या रात्रीही माधवने नेहमीसारखाच फोन केला…
“हॅलो… गौर…”
“हॅलो… गौर…”
पण पलिकडून उत्तर येण्याआधीच
त्याला तिच्या आवाजातली ओल जाणवली…
माधवला गौरवीच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला...
त्याला तिच्या आवाजातली ओल जाणवली…
माधवला गौरवीच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला...
"गौर...? तु रडतेस का...? काय झालं...? आईबाबा काही बोलले का...? सांग ना गं... असा माझा जीव टांगणीला लावू नकोस…”
क्षणभर शांतता पसरते…
मग दबलेला, थरथरता आवाज माधवच्या कानी पडतो…
“माधव… मला हा दुरावा सहन होत नाही रे… तुझ्याशिवाय जगणं खूप अवघड होतंय… मला खूप एकटं वाटतेय… माधव मी तुझ्याशिवाय आता जगू शकत नाही... मला तुझ्यासोबत राहायचे आहे... तुझ्या जवळ... नाहीतर मी माझ्या जीवाच काहीतरी बरं वाईट करेन..." गौरवी

"ऐ वेडाबाई... काहीतरी भलतासलता विचार डोक्यात आणायचा नाही... आणि कोणताही वेड्यासारखा पाऊल उचलायचा नाही... मी तुझ्या सोबत आहे आणि कायमचा असेन... आणि मनात कोणतेही विकार आणू नकोस... कारण तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे... त्यामुळे असले फालतू चुकीचे आणि घाणेरडे विचार सुद्धा तु मनात आणायचा नाही... समजलं...?" माधव थोडा कडक आवाजात बोलतो...
तो थोडा थांबतो… आणि पुन्हा बोलतो...
“आज परिस्थिती आपल्याविरुद्ध आहे… पण याचा अर्थ असा नाही कि आपणं आपलं आयुष्य थांबवायचं…”
“तू खूप मजबूत आहेस…
आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे…”
माधवचा आवाज आता मऊ होतो…
“आपण मार्ग शोधू…
वेळ लागेल…
पण आयुष्य नक्कीच जिंकेल…”

पलिकडून त्याला हुंदका ऐकू येतो…
"ऐ गौर... आधी रडणं थांबव... प्लीज..."
"ऐ गौर... आधी रडणं थांबव... प्लीज..."
गौरवी रडणं थांबवते आणि म्हणते...
"काहीच मार्ग नाही का...? फक्त हातावर हात ठेवून वाट बघत बसायचे का...?"
"काहीच मार्ग नाही का...? फक्त हातावर हात ठेवून वाट बघत बसायचे का...?"
"एक मार्ग आहे... पण मला तो योग्य वाटत नाही..." माधव
"कोणता...?" गौरवी
"जाऊ दे..." माधव...
"ठिक आहे... जर तुला सांगायचे नसेल तर काही हरकत नाही... पण माझ्याकडे सुद्धा एक मार्ग आहे..." गौरवी
"कोणता...?" माधव
" आपण जर पळून जाऊन लग्न केले तर...? गौरवी
"पळून जाऊन लग्न..." माधव
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा